20 मिनिट-भाग 2


इतर भाग वाचण्यासाठी    20 मिनिट- भाग 1             २० मिनिट भाग-३          २० मिनिट -भाग 4


       माझ्या नेहमीच्या स्टेशन वर न उतरता तिच्या स्टेशन वर उतरण आणि निघताना पुन्हा तिथूनच लोकल पकडन हा माझा नविन उपक्रम चालू होता मागच्या ३-४ दिवसांपासून तो हि फ़क़्त तिला पाहण्यासाठी. पहिल्याच दिवशी ते काय थोड बोलली होती तितकच . परत बोलन झाल नाही दुरूनच तिला पाहत राहायचो , मुद्दाम लेडीज डब्ब्याच्या बाजूच्या डब्ब्यात बसायचो तिला चोरून पाहता याव यासाठी  .

          शनिवार चा दिवस होता . माझ ऑफिस लवकर सुटल होत , आणि झालेल्या सवयी प्रमाणे मी पुढच्या तिच्या स्टेशन वर गेलो , माहित नव्हत तीच हि ऑफिस लवकर सुटणार होत कि नेहमीच्या वेळेला. पण गेलो तिच्या स्टेशन वर बघूया नशिबात काय आहे अस स्वताशिच म्हणून , स्टेशन वर उतरलो आणि नेहमीच्या जागी जावून उभा राहिलो पण ती काही दिसली नाही , मनात पुन्हा विचारांचं चक्र सुरु झाल , मी मुद्दाम येणारी एक-एक लोकल सोडत होतो , ती येयील ह्या आशेने , १० मिनिट , १५ मिनिट , अर्धा तास तसाच तिथ उभा होतो तीची वाट पाहत , इकडे तिकडे पाहत , तोच पायर्यांवरून प्लेटफार्म  कडे येताना ती दिसली , मन आनंदाने उड्या मारायला लागल होत माझ , ती नेहमीचा लेडीज डब्बा पकडण्यासाठी येत होती तोच लोकल आली , त्या दिवशी तशी फारशी गर्दी हि नव्हती पण लोकल सुटणार म्हणून घाई घाईत ति लेडीज डब्ब्यात न जाता जनरल डब्ब्यात शिरली .. मी हि त्याच डब्ब्यात होतो , पण मला माहिती नव्हत कि ती माझ्याच  डब्ब्यात होती ते , मी एका सीट वर जावून बसलो होतो त्या पलीकडच्या डब्ब्यात नजर लावून तीला पाहण्यासठी तोच समोरच्या सीट वर ती येवून बसली . थोडा वेळ मला काही कळलच नाही , स्वप्न तर नाही ना बघत म्हणून स्वतालाच हलकासा चिमटा काढून पाहिला ,स्वप्न नव्हत, खरच ती माझ्या समोर बसली होती ह्याची खात्री पटली , दररोज तिच्या कडे टक लावून पाहणारा मी, ती आज एवढ्या समोर बसली असतानाही तिच्याकडे पाहण्यची हिम्मत माझ्यात होईना , मी उगाच इकडे तिकडे पाहत राहयचो , पण एक वेळी ती माझ्याकडे एका प्रश्नार्थक नजरेने पाहत असल्याच जाणवल , मी न पाहिल्यासारख केल , तोच तिने मला विचारलं "तुम्हाला कुठ तरी पाहिल्या सारख वाटतंय ?”  तिच्या ह्या प्रश्नाने माझ्या हृदयाची धड-धड लोकल च्या स्पीड पेक्षा जास्त जोरात वाढवली होती . मी विचार करत असल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणले तोच ती म्हणाली "हो !, त्या दिवशी मी तुम्हाला पत्ता विचारला होता ना ? ते तुमीच ना ?” मी आश्चर्यचकितच राहिलो आणि मलाही आठवल्यागत हो-हो केल , मनात विचार केला अशी बोलायची संधी पुन्हा पुन्हा नाही भेटायची आणि मी हि सुरु झालो बोलायला "काय मेमरी आहे तुमची ? मस्तच , एकदाच पाहिलेलं लक्षात राहील ?” ती काही बोलली नाही पण हसली गालात , अगदी गोड . एका मागून एक स्टेशन जात होत आणि आमच्या गप्पा ही रंगात आल्या  होत्या , ऑफिस कुठ , काय जॉब अशा वर वरच्या गोष्टी , तिने हि मला माझ्या ऑफिस बद्दल विचारल , मी म्हटल मी अमुक कंपनीत आहे , ह्या ठिकाणी , त्यावर ती म्हणाली "मग तुम्हाला ते अलीकडच स्टेशन जवळ आहे ना, तुम्ही इथून का लोकल पकडता ?” हा माझ्यावराचा तिने टाकलेला आणखी एक बोम्ब , मी पण एक कारण पुढ केल "त्या स्टेशन वर फार गर्दी असते बुवा , ह्या स्टेशन वर किमान उभ राहायला तरी जागा मिळते ” बहुतेक तिला माझ उत्तर पटल  असाव , तस तिच्या चेहऱ्यावरून वाटत होत , गप्पा सुरूच होत्या आमची अगदी एकमेकांचे नंबर शेअर करे पर्यंत आमची ओळख झाली होती आज . तितक्यात तीच स्टेशन येणार होत , २० मिनिट कशी दोन मिनिटात गेली अस वाटायला लागल , ती निघायला लागली  , “उद्या तर सुट्टी आहे , परवा भेटू अस म्हणत तिने निरोप घेतला ”आणि  ती तिच्या स्टेशन वर उतरली आणि मी त्याच क्षणापासून आमच्या सोमवारी होणार्या भेटीबद्दल स्वप्न रंगवायला हि लागलो.

       पहिल्यांदाच मी सोमवारची एवढ्या उतावळेपणाने वाट पाहत होतो , रविवार नकोसा झाला होता मला , कसाबसा सोमवार उजाडलं , आणि तिच्या अनामिक ओढीने मी संचारलो . काय घडणार होत कशाचीच कल्पना नव्हती , पण मनातून मात्र मला जाम भारी वाटत होत.

ह्या सोमवारी घडलेल्या अणि त्यानंतर च्या  घडामोडी तुम्हाला सांगेण पण पुढच्या भागात . 

-प्रफुल्ल शेंडगे.  

इतर भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा   20 मिनिट- भाग 1        २० मिनिट भाग-३      २० मिनिट -भाग 4

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-