प्रेमाची दूसरी इनिंग ?





रविवारचा दिवस होता , आरामात उशिरा उठून खिडकीपाशी जावून उभा होतो , हातात चहाचा कप घेवून , रस्त्यावरच्या गर्दीला न्याहाळत , येणाऱ्या जाणार्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत , त्यावेळी घरात मी एकटाच होतो , बाहेर जरी गोंधळ असला तरी  घरात मात्र  एक विशेष  शांतात होती , जणू आज सार्यांचच मौन व्रत होत , त्या शांततेला मीच काय तो छेद देत होतो , माझ्या फुरक्या मारून चहा पिण्याच्या आवाजाने . चहा पिवून संपला होता तरी मी हातात कप घेवून तसाच उभा होतो विचारांच्या दुनियेत हरवून गेलेला . शून्यात काहीतरी विचार करायला लागलो पण त्या मनातल्या विचाराणा काही विशेष अर्थ होता ना कोणती गती , फ़्क़्त ओठांवर शब्द येत  नव्हते म्हणून त्यांना  विचार अस म्हणायला लागत होत .

         तितक्यात माझा फोन खणखणला , मी माझ्या धुंदीतून बाहेर आलो आणि मोबाईल च्या आवाजाच्या दिशेने  मोबाईल शोधायला लागलो , "कुठे ठेवला मी मोबाईल , पाहिजे तेव्हा मिळणार नाही " अस स्वताशीच बोलायला लागलो . पूर्ण घरात त्या फोनचा  आवाज घुमायला लागला ,झटकन बेड वरची चादर सरकावली तेव्हा कुठे एका कोपर्यातला तो मोबाईल दिसला , पण तोपर्यंत फोन डिसकनेक्ट  झाला होता . तसाच मोबाईल उचलला आणि कॉल  हिस्ट्री चेक  करायला लागलो , कुणाचा फोन आहे ते पहायला , मिस कॉल ची लिस्ट पाहिली आणि थोडा हबकलोच , कपाळावर आठ्या आणत  मनात स्वतशीच बोललो "खरच मला केला होता कॉल कि , चुकून लागला होता ? चुकून लागला असेल , मला कशाला करेल ?"  अस बोलून फोन पुन्हा बेड वर फेकला , तोच पुन्हा रिंग वाजली . दुरूनच मोबाईल च्या स्क्रीन वर नजर टाकली , पुन्हा तोच नंबर, तेच नाव आणि पुन्हा विचार
 "चुकून नव्हता केला म्हणजे ? पण का केला असेल ?, अरे आधी उचल ना त्या शिवाय कस कळेल ?" एक मन मला सांगत होत. तर दुसर म्हणत होत "नको उचलू ", ह्या दोघांच्या रस्सिखेचात मी अडकून गेलो आणि हा दुसरा कॉल पण मिस झाला . 
"उचलायला हवा होता फोन ", 
"नाही उचाललास तेच बरोबर केलस " 
पुन्हा दोन मनाची  रस्सीखेच सुरु झाली .  मी तसाच बेडच्या एका बाजूला  बसलो , फोन हातात घेतला आणि ते नाव बघत राहिलो , त्या नावात खूप काही होत , जे मला कधी नव्हत हव ते हि त्या नावाने दिल होत मला. त्या नावाच्या आठवणीत मी थोडा थोडा शिरायला लागलो होतो तोच तिसर्यांदा फोन वाजला , त्याच व्यक्तीचा . आता मात्र ठरवलं , उचलायचाच फोन , आणि थरथरत्या हाताने फोन रिसीव केला , पण दोन्हीकडून हि कुणी बोलेना , पुन्हा निरव शांतात , ऐकू येत होता तो फ़्क़्त फुललेल्या  श्वासांचा आवाज. काही सेकंद असेच गेले , मग पलीकडूनच आवाज आला 
"हेल्लो ", 
तोच आवाज , पुन्हा कानात घुमला तो थेट हृदयात जावून असा काही टोचला कि , डोळ्यांचे काठ पाणावले माझे  , सावरत  मी हि हेल्लो म्हटल , पण नाव न घेता , तोच तीकडून प्रश्न आला "कसा आहेस ? ओळखलस का ? ", 
मी एक दीर्घ श्वास स्वतामध्ये भरला आणि उत्तरलो "आहे ठीक ! , आणि ओळखायच म्हणशील तर तुझा नंबर आज हि सेव आहे , तुझ्या आठवनिन्प्रमाणे "   माझ्या ह्या उत्तरवार तिकडून काहीच आवाज आला नाही , आता मीच विचारल 
"मलाच फोन केला होतास कि चुकून लागला ?".
 "चुकून नाही , मुद्दामच केला , बोलायचं होत तुझ्याशी " , 
ह्या तिच्या उत्तरावर  भुवया उंचावून मी म्हणालो 
"माझ्याशी  बोलायचय ? तुला ? ". 
"हो" तिने उत्तर दिल, 
"ठीक आहे बोल "- मी , 
"फोन वर नाही , समोरा समोर बोलायचं आहे , भेटशील का ?"-तिने विचारल , 
"ठीक आहे , जर इतक महत्वाच असेल तर भेटेन " मी जास्त विचार न करता उत्तर दिवून टाकल . 
"चालेल मग , आज संध्याकाळी ६ वाजता  , शिवाजी चौकातल्या कॉफ्फी शोप मध्ये भेटूया ?", 
"चालेल , येयील मी " मी उत्तर दिल , 
"थैंक्स, भेटू, तेव्हा बोलेल सगळ  " अस म्हणत तिने फोन  ठेवला.  मी मात्र काही वेळ तसाच फोन कानाशी पकडून बसलो होतो , एखाद्या पुतळ्यासारखा . 

सहा कधी वाजतायेत म्हणून मी सारखा घड्याळात बघत होतो , आज घडाळ्यातले काटे चालतच नाही आहेत का ? अस वाटायला लागल होत . तर एक प्रश्न अजूनही मला भेडसावत होता तो म्हणजे "काय बोलायचं आहे आज एवढ तिला ?",. कसेबसे घड्याळात साडे पाच वाजले , आणि मी तयार होवून बाईक घेवून घराबाहेर पडलो शिवाजी चौकाच्या दिशेने . आज रविवार ना , रस्त्यावर एवढ ट्राफिक नव्हत , रोज २०-२५ मिनिट खाणारा हा प्रवास आज १५ मिनिटात पूर्ण झाला . मी कॉफी शोप जवळ जावून उभा राहिलो , ६ वाजायला अजून दहा मिनिटे बाकी होती , मी शोप मध्ये जावून एका टेबलापाशी जावून बसलो . मोबाईल मध्ये डोक खुपसून. १०-१५ मिनिटानंतर कुणी तरी माझ्या टेबलपाशी उभ असलेल मला जाणवलं आणि मी मोबाईल मध्ये खुपसलेल माझ डोक वर काढून पाहिलं . समोर "ती" उभी होती . तिला समोर पाहून मी थोडा गडबडलो , चेहर्यावर  हसू आणून तिच्या कड पाहिलं आणि हाय-हेल्लो केलं , खुर्चीवर बसता बसता तिने विचारल "उशीर झाला का मला ?", 
"नाही ग तुला उशीर नाही झाला , मलाच घाई असते ना नेहमी "- मी चटकन बोलुन गेलो .
माझ हे उत्तर तिच्या मनाला लागल होत , तिच्या चेह्रार्यावर दिसत होत ते . पण तीन ते दाखवून न देता विचारलं "किती दिवसांनी भेटतोय ना आपण , दीड वर्ष झाला असेल ना ?".  
"दोन "-मी , 
"काय ?"- ती , 
"दोन वर्ष , झाली . आपल्याला शेवटच    भेटून " मी तिला म्हणलो .
 त्यावर ती म्हणली "टोमणे देतोयस ? दे चालेल , चूक माझीच होती ना ", 
"नाही ग टोमणे नाही देतय , खरच नाही , फ़्क़्त जे तुझ्याशी  ह्या दोन वर्षात बोलायचं होत ते येतंय ओठांवर , बाकी काही नाही  "- मी . 
मला माहिती होत माझ हे अस बोलन तिला दुखवत असेल पण त्यावेळी मी जे बोलत  होतो त्यावर माझा कंट्रोल नव्हता आणि तीही आज सगळ ऐकून घेत होती . तितक्यात वेटर आला , त्याला कॉफी ची ऑर्डर दिली आणि मग मीच विषय बदलला "तुला काहितरी बोलायचं होत ना माझ्याशी ?  "

माझा हा प्रश्न ऐकून तिने मान खाली घातली आणि माझ्याशी बोलायला लागली "कस सांगू तुला ? मला माहिती आहे मी तुला फार हार्ट केल होत , तुला मी आवडायची , तुझ माझ्यावर प्रेम होत त्या प्रेमाला मी धुडकावल होत ", ती बोलत होती , मी तीच हे सार बोलन ऐकत होतो , वेटर ठेवून गेलेल्या टेबलावरच्या कॉफीच्या वाफाही थंड होत होत्या पण तीच एका मागून घडलेल्या गोष्टी  सांगण चालू होत . त्यातच मी तिला विचारल
 " पण इतक्या वर्षांनी का आठवतेस तू हे सगळ " माझा प्रश्न संपतो न संपतो तोच तिने उत्तर दिल 
"कारण मला आत्ता कळतंय खर प्रेम काय होत ते , जे तू माझ्या वर करत होतास , आणि मी ते समजू शकले नाही हे मला आत्ता कळतंय " बोलताना तिच्या डोळ्यात पाणी साठल होत ते पाहून ही मी तिला सावरायला मदत करत नव्हतो कारण मी स्वतालाच सावरत होतो तिच्या पासून दूर राहण्यासाठी . 
"पण आत्ता अस काय घडल कि तुला माझ प्रेम खर वाटल ?",- मी विचारल , 
"ह्या दोन वर्षात खूप काही घडल "-ती हळूच म्हणाली  . त्यातच तिने माझ्या  हातावर स्वताचा हात ठेवला , तिच्या स्पर्शाने माझ्या  अंगावर शहारे उभे राहिले होते , कपाळावर घाम फुटला, आणि डोळ्यांसमोर एक अंधारीशी आली  , ह्याच दरम्यान तिने विचारल "आज हि आहे का तुझ प्रेम माझ्यावर ? मला हवय तुझ प्रेम ", तिचा हा प्रश्न ऐकताच मी तिच्या हाताखालचा माझा हात झटकन  काढून घेतला आणि दोन्ही हात माझ्या छातीशी बांधून घडी घालून बसलो आणि थरथरत्या ओठांनी उत्तर दिल 
"नाही , नाही पडायचं मला तुझ्या प्रेमात परत ". 
"का ?"-तीने प्रतिप्रश्न केला  .  
"एकदा सावरलाय मी स्वताला , पुन्हा तू सोडून निघून गेलीस तर स्वतला सावरायची हिम्मत नाही माझ्यात , खरच नाहीये "  माझे डोळे लाल झाले होते सोबत होते ते डोळ्यात साठलेलं  गरम अश्रू , जे कधीही काठ ओलांडून बाहेर पडतील , मी हाताची घडी आणखी घट्ट  केली आणि उगाच चेहऱ्यावर हसू आणायला लागलो , माझ्या आसवांना कंट्रोल करायला  . ती माझ हे बोलन पापणी न लवता ऐकत होती , बहुतेक तिलाही जाणीव होती तिने दिलेल्या दुखाची . माझ बोलून पूर्ण ऐकून तिने शांतपने उत्तर दिल 
"नाही रे , परत नाही जाणार तुला सोडून , काधीच नाही , तुझी शपथ... ". 
मी कपाळावरचा घाम पुसला आणि म्हटल "पण माझ्या कड तुला देण्यासारख काहीच नाही . तेच फाटक नशीब आहे माझ्या पाशी , ज्या मुळे तू मला सोडून गेली होतीस दोन वर्षापूर्वी , किमान त्यावेळी माझ्या कडे तुला द्यायला प्रेम तरी होत , ते हि आता कमी झालाय , मग का हा हट्ट ? ". 
"कमीच झालाय ना ? संपल तर नाहीये ना तुझ प्रेम माझ्यावरच  ?" अस म्हणून तीने माझ कारण खोडून काढल , मी पण म्हटल , "तूच म्हणत होतीस ना कि फ़्क़्त प्रेमानी पोट भरत नाही ते , त्याच काय ? ", 
"हो खरय ! मी म्हणाले होते ते , पण मला माहित नव्हत तेव्हा प्रेमाची ताकद , जी पोटातल्या भुकेपेक्षा जास्त असते ते   ". आज ती माझ एक-एक म्हणन खोडून काढत तिच्या प्रेमात मला ओढायचा प्रयत्न करत होती , पण माझ मन गुंतल होत भूतकाळातल्या गोष्टीत , त्या वेळी कोणताही निर्णय घेन्याच्या स्थितीत  नव्हत माझ मन , मग मी तिला तस स्पष्टच सांगितल "खरच मला आता काही एक कळत नाहीये , मला वेळ हवाय विचार करायला  ". 
 "चालेल घे ना वेळ "- ती म्हणली .
 "निघूया का आपण ? " अस म्हटल  मी आणि निघायला लागलो तोच स्वताला थांबवत म्हटल "मी काय निर्णय घेयील माहित नाही , पण उगाच तू जास्त आशा घेवून नको ठेवुस , आपेक्षाभंगाच दुखः फार त्रास देत , अनुभव आहे मला म्हणून सांगतो ." माझ्या ह्या बोलण्यावर ती हसली आणि बोलली 
"तू काहीही निर्णय घे , मला चालेल , काय घडेल जास्तीत  जास्त ? एक तर मला माझ्या वागण्याची शिक्षा मिळेल नाही तर तुझ्या रूपाने एक प्रेम ". ह्या तिच्या बोलण्यावर माझ्याकडे काहीच उत्तर किंवा प्रतिप्रश्न हि नव्हता . मी विषय बदलला आणि तिला "तुला कुठ सोडू का ?"  अस विचारल . तिने नकारार्थी मान हलवली आणि म्हटली "नाही ,जाईन माझी मी ".


मी आणि ती त्या कॉफी शॉप मधून बाहेर पडलो आणि आपापल्या दिशेने निघालो  , मी घरी पोहचलो ते विचारांचं , प्रश्नाचं आणि तिच्या चेह्रारयावरच्या भावांच आणि अपेक्षांचं भल मोठ गाठोड घेवूनच .   ते सार गाठोड मी  कस सोडवनार होतो  मलाच माहीत नव्ह्त .


-प्रफुल्ल शेंडगे .

२० मिनिट -भाग 4



इतर भाग वाचण्यासाठी   :-   २० मिनिट-भाग 1                    २० मिनिट भाग-2           २० मिनिट -भाग 3


                         "कळत नाही का तुला ,माझी होणारी अवस्था ? कि कळतंय तुला पण दाखवत नाहीस ? राग येतोय मला तुझा त्यावेळी जेव्हा तू बोलत नाहीस तेव्हा , का अशी वागतेस नेहमी , बोल ना " असे काही संवाद चालू असतात माझेच माझ्या मनाशी आजकल . सार काही ठीक चालू होत , मला वाटल होत माझ्या प्रेमाची गाडी सुसाट जायील.  तसे आम्ही रोज भेटायचो जाळी  पलीकडून कधी  नजरेने तर कधी  फोन वरून बोलन  व्हायचं , शनिवार तर माझ्यासाठी सोन्याचा दिवस असायचा , त्या दिवशी  तिच्यात आणि माझ्यात ती जाळी हि नसायची , आम्ही दोघही थेट समोरासमोर . तत्वांशी , अगदी तत्व वगेरे म्हणता येणार नाही पण जे मी स्वतालाच जे नियम लावून ठेवले होते ते मी तिच्यासाठी खुशाल मोडत चाललो होतो , आतापर्यंत एखाद्याही मुलीला मी फ्रेंडरिक्वेस्ट  पाठवली नव्हती ती तिला पाठवली , किती हि जवळची मैत्रीण असली तरी कुणा मुलीला मी तिचा फोन नंबर विचारला नव्हता , तो हि मी तिला विचारून बसलो , रोमांटिक  मधला र हि न उच्चारणारा मी तिच्याशी इतक्या लाडाने आणि रोमांटिकपने कसा बोलायचो हे तर माझ मलाच न सुटलेलं कोड . तिला प्रपोज करण वगेरे मला जमलच नव्हत कधी , शब्दांच्या आडून मी तिला दाखवून द्यायचो ते इतकच , पण   मी ते थेट  प्रपोज करण जाणून बुजून टाळत  होत कारण मनात भीती होती टी तिच्या नकाराची, बहुतेक नकारची हि तितकीशी भीती नव्हती जितकी तिला हरवून बसायची होती माझ्या आयुष्यातून .

                   पण माझ्या ह्या प्रेमाच्या रस्त्यात एक  स्पीड ब्रेंकर आलाच .... बहुतेक माझ्या ह्या गाडीला कायमचाच ब्रेक लावायला लागतो का अस वाटायला लावणारा .
                   दरोरज एकटी प्रवास करणारी ती , आता तिच्या रोजच्या प्रवासात तिच्या सोबत तिच्याच ऑफिस चा एक मुलगा असायचा , तो हि आमच्याच लोकल  च्या रूट वर राहायचा , आधी मला इतक काही वाटायचं नाही पण नंतर नंतर माझ्या मनाचा तीळपापड व्हायचा, तिला तिच्या सोबत हसताना पाहायचो , तिला त्याच्याशी इतक  मनमोकळेपणाने बोलताना , वावरताना पाहायचो तेव्हा त्या मुलाचा हेवा वाटायचं मला , मनात राग हि यायचा तिच्यावर पण त्या मुलावर कधीच राग असा म्हणून यायचा नाही बहुतेक तो माझ्या इतक्या क्लोज  नव्हता  जितकि ती मला क्लोज वाटायची म्हणून असाव कदाचित, तय दोघांच  सोडा माझ स्वताच मन हि आता माझ्याशी निट  वागेना अस वाटायला लागल होत , दुतोंडी झाल होत , कधी हे सांगायचं तर कधी ते , एकदा सांगायचं कि नाही ते दोघे फ़्क़्त मित्र असतील अस म्हणून समजूत घालायचं तर कधी "त्या दोघांच असेल प्रेम एकमेकांवर " अस बोलून मला पुन्हा घाव देवून टाकायचं . काय कराव काही कळायचं नाही मला त्या वेळी , मी खूप विचार करून ते सार टाळायचा प्रयत्न करायचो , लोकल मध्ये हि डोळे बंद करून घ्यायचो , पण आत मध्ये घुसमट चालूच असायची .स्वताचाच राग यायचा मला , कधी कधी वाटायचं विचाराव तिला डायरेक्ट ," तुला मी आवडतो का ?",वाटायच भांडाव  तिच्याशी, बोलून टाकाव मनातल सार , पण पुन्हा स्वतालाच आवरायचो , उगाच वरवरच हसून टाकायचो , मुद्दाम तिला त्याच्या नावाने चिडवायचो , ती जेव्हा "तस काही नाही आहे  आमच्यात " अस म्हणायची ना तेव्हा मनात कुठ बर वाटायचं पण परत विचार सुरु "ती मला खोट  तर नसेल ना सांगत ?, ती का सांगेन मला तीच त्याच्या वर प्रेम आहे ते ?, आणि खरच नसेल तस त्यांच्यात काही ,पण तुझ्याविषयी तिला काय वाटत ते कुठ सांगितलय तिने  " असे एका मागून एक प्रश्न गर्दी करायला लागायचे , वेड लागायचं बाकी होत फ़्क़्त मला . कधी कधी तिला माझ्या विषयी काही वाटत का हे जाणून घ्यावास वाटल तर ,मुद्दाम नाही जायचो तिच्या स्टेशन वर , भेटायचो नाही तिला , बोलायचो हि नाही . वाटायचं विचारेल मला ती स्वताहून "का नाही आलास आज , का बोलत नाहीयेस " पण ती हि हा सारा गुंता वाढवून ठेवायची , काहीच विचारायची नाही , स्वताहून बोलायची हि नाही , शेवटी मीच बोलन सुरु केल कि ती बोलणार अस नेहमीच झाल होत आजकल, तेव्हा तर पारा इतका चढायचा माझा कि , विचारानी डोक फुताय्ची वेळ यायची , डोळ्यातून पाणी येवून गालावरून ओघळेल अस वाटायचं , पण डोळे मिटून पुन्हा तिचा चेहरा डोळ्यासमोर आणायचो , आणि पुन्हा नॉर्मल व्हायचो , रात्री झोपता झोपता "तीच आणि त्याच " नात कस खर आहे , ते दोघच कसे  ठीक आहेत एकमेकांसाठी, आनी मी कसा नालायक , ती माझी कधीच होणार नाही  अस मन सांगत राहायच आणि त्याच विचारात सकाळ व्हायची पण सकाळी पुन्हा नव्याने सुरुवात व्हायची , तिला पाहायचो आणि वाटायचं "नाही , ती होईल माझी , वेळ लागेल तिला मला समजून घ्यायला , आवडेल तिला मी पण , नसेल सांगत ती मला , तिला वाटत असेल मी सुरुवात करावी सांगायला "अस खूप काही.

                        इतक सार होवूनही कुठल्याच बाबतीत स्पष्टता येत नव्हती , दिवसांमागून दिवस जात होते , आणि त्यातच एक दिवस उजाडला , कंपनी कडून मला दोन महिन्यासाठी बाहेर गावी जायचं होत , अस कळाल , आणि माझ्या मनातल्या प्रश्नानीही सुटकेचा श्वास सोडला , दोन महिने मी बहुतेक ह्या रोजच्या तिच्या विचारातून दूर जाईल अस वाटल होत , ह्या दोन महिन्यात मी माझ एकतर्फी प्रेम  विसरून जाव असा मनाने मला आदेश दिला , बहुतेक तिला हि माझ्या अशा वागण्याचा त्रास होत असावा पण तिने बोलून दाखवला नसावा, तिला ही माझा पजेसिवनेस दिसला असावा  , बहुतेक ती हि यातून सुटणार होती . त्यादिवशी त्या मुंबईच्या ऑफिस मध्ये माझा शेवटचा दिवस होता  , त्या दुसर्या शहरात तर सोमवारी जायचं होत , आणि मी रविवारी निघणार होतो , पण मी शनिवारी मुद्दाम सुट्टी टाकली होती , शुक्रवारी सकाळी जेव्हा ती मला स्टेशन वर भेटली तेव्हा मी तिला "मी बाहेरगावी चाललोय , दोन महिन्यांसाठी " अस सांगितल , मला वाटल होत ती काहीतरी रियेक्ट  होईल पण नाही ती काहीच बोलली नाही तस , फ़्क़्त अभिनंदन कल इतकच , जाता जात विचारल ," संध्याकाळी येशील ना इथे तेव्हा बोलू , मी निघते " , अस बोलून ती निघून गेली . तेव्हा वाटल, खरच  तिच्या मनात माझ्या विषयी काहीच नाहीये , बहुतेक हेच नशिबात होत  अस मानून मी  मन खट्टू  न करता ऑफिस ला गेलो , संध्याकाळी ऑफिस मध्ये ऑफिस च्या स्टाफ नि एक छोटीशी पार्टी ठेवली होती , रात्रीचे ९ वाजले ऑफिस मधून निघता निघता ,  ऑफिस सूटन्याच्या  वेळेपासून ते आतापर्यंत माझा मोबाईल एकदाही वाजला नाही , त्यामुले मी ही त्याच्या कड़े दुर्लक्ष कल  , ती निघून गेली असेल कधीच , शेवटची भेट हि नाही झाली अस मनात बोलत राहिलो , माझ्या  ऑफिस  च्या स्टेशन वर इतकी गर्दी नव्हती त्यावेळी पण मन म्हणत शेवटच जावून येवुया तिच्या स्टेशन वर , ती  नसली म्हणून काय झाल , तिच्या आठवणी तरी आहेत , म्हणून गेलो मी तिच्या स्टेशन वर , उतरलो तेव्हा नजर फिरवली असेल का  ती इथ  अशी आशा मनात ठेवून ,पण नाही दिसली ती .

          मग तसाच जावून एका खिन्न मनाने एका बाकड्यावर जावून बसलो लोकल ची वाट बघत , तोच माझ्या समोर येवून ती उभी राहिली .  तिला तिथे पाहताच, माझ्या मनातले सारे विचार पळून गेले , मि स्तब्ध तिच्या समोर उभा राहिलो , काहीच न बोलता , तेवढ्यात तिने माझ्या एक कानशिलात जोरदार लगावली,तेव्हा कुठ मी  माझ्या समाधीतून बाहेर आलो , काय झाल काही कलालच  नव्हत मला, तोच दुसरा एक धक्का , ती मला बिलगून रडायला लागली , स्टेशन वरच्या २-३ जणांच्या नजरा माझ्याकडे बघायला लागल्या  होत्या , मला अगदी अवघडल्यासारख  झाल होत , पण तीच अस वागण हि तितकाच माझ्यासाठी धक्कादायक असल तरी मला आवडणार होत . तिला माझ्या मिठीतून बाहेर काढण्याचा मला जमत नव्हत , कदाचित मला ते जमवून घ्यायचाच नव्हत . तिने स्वतालाच सावरल आणि माझ्या कडे  रागाने बघायला लागली , मी हि " काय झाल ? काय झाल रडायला ?" अस विचारयला लागलो , तिने  हि मग रागारागतच उत्तर द्यायला सुरुवात केली , "आपल ठरल होत ना , संध्याकाळी भेटायचं म्हणून  ,किती वाजले बघ , किती फोन करत होते , फोन पण स्वीच ऑफ ? नाहीये ना तुला माझी काळजी ? तुझ्या साठी थांबलीय मी इथ पण तुला काहीच नाही ना , वाटल होत बोलशील माझ्याशी , करशील मला प्रपोज , नाही मीच वेडी आहे तुझ्या प्रेमात , तुला काय?  " अस एका मागून एक तीच बोलन सुरु होत नि तीच हे  बोलन मला माझ स्वप्न , प्रेम पूर्ण होत असल्याची अनुभूती देत होत . त्यावेळी मी काय करू , मला काहीच सुचेना , मी फ़्क़्त तिच्याकडे मठठा सारखा बघत होतो , तीच माझ्या वरच प्रेम न्याहाळत होतो , आता माझी वेळ होती प्रेम व्यक्त करायची पण कस करू ? , मग मीही तिला रागाचा आव आणूनच विचारल "आत्ता  सांगतेस प्रेम आहे ते , आधी सांगायचं ना , मला काय स्वप्न पडल होत का तुझ हि माझ्यावर प्रेम आहे ते कळायला ?" तीच ह्या सार्या वर उत्तर तयारच होत , ती म्हणाली "मुली नसतात सांगत कधी मुलांना त्यांच प्रेम आहे ते , नसतात करत त्या प्रपोज  मुलांना , एवढ हि  नाही कळत तुला ?, दिसत नवहत  का तुला माझ्या डोळ्यात तुझ्यावरच प्रेम ? " अस आमच बोलन चालूच होत , तशातच आम्ही आमची ट्रेन पकडली .

            मी आज जम खुश होतो , माझ पहिल वहिल  प्रेम पूर्ण झाल होत , पण दोन महिने  दुरावा सहन करायला लागणार होता त्याच थोड दुखः होतच पण तिच्या वरच्या प्रेमापुढे ते काहीच नव्हत . मोबाईल , मेसेज वगेरे सार असल तरी हे दोन महिने कसे सरनार होते  माहित नाही .                

- प्रफुल्ल शेंडगे .

इतर भाग  वाचण्यासाठी  :-   २० मिनिट-भाग 1        २० मिनिट भाग-2           २० मिनिट -भाग 3

20 मिनिट-भाग 3



२० मिनिट-भाग 1                    २० मिनिट भाग-2


          अखेर सोमवारचा तो दिवस उजाडलाच , शनिवार पासून वाट पाहत होतो , हे दोन दिवस कित्येक वर्षांसारखे भासत होते , आज लवकरच उठलो झोपेतून , रात्रीच एक छान शर्ट इस्त्री करून ठेवला होता , तिला आवडेल ह्या हिशोबाने , तयार होवून किती तरी वेळा मुद्दाम आरशात पाहत होतो , कसा दिसतोय ते , छानसा परफ्युम पण मारला , माझ हे अस वागण पाहून  आतापर्यंत घरातल्यांच्या नजरा जरा जास्तच तीक्ष्ण व्हायला लागल्या होत्या म्हणून मी त्यांनी काही विचारण्याच्या आत घरातून स्टेशन ला जायला निघालो , मनात एक कमालीचा उत्साह घेवूनच, तिला भेटायला , तिच्याशी बोलायला मन उत्सुक होत . ८:४० ची लोकल पकडली, गाडी तिच्या स्टेशन वर येवून थांबली तशी माझी नजर  त्या जालीपालीकडे तिलाच शोधायला लागली , पण ती काही दिसली नाही त्यात  आज सोमवार ना गर्दी जरा जास्तच होती एका नजरेत स्पष्ट दिसेना , दोन तीन वेळा नजर भिरकावली तिकडे पण नाहीच , ती दिसलीच  नाही आणि त्या बरोबर सुरु झाले माझ्या  मनात विचार ," ती आज आलीच नसेल का ?" असे, इतका तयार झालो होतो तिच्या साठी पण तीच आली नाही म्हणून मन उदास झाल होत तोच मोबाईल वाजला , त्या गर्दीत कसाबसा खिशातून मी मोबाईल काढला आणि सरळ कानाला लावला , पलीकडून कोण काय बोलत होत ते निट  कळत नव्हत नुसता गोंधळ ऐकू येत होता , म्हणून मोबाईल पुन्हा कानाशी घट्ट पकडून  आवाज ऐकायचा प्रयत्न करायला लागलो तेव्हा कुठे काही पूसटशे  शब्द ऐकायला मिळाले "समोर बघ , समोर " मला पहिल्यांदा काही कळलच नाही पण जेव्हा मी  समोर बघितल तर   थोडा धक्काच बसला , सुखद धक्का , त्या पलीकडच्या डब्ब्यातून ती मला पाहून माझ्याशी बोलत होती , हाय करत होती चेहऱ्यावर एक स्माईल देवून , त्यावेळेला माझी झालेली अवस्था काय सांगू , मी इतका खुश झालो होतो कि मी आता शम्मी कपूर सारख "याहू "म्हणून ओरडेल कि काय अस वाटत होत मला ,  "मन मे लड्डू फुटावा " अस काही वाटत होत , टक लावून मी आत्ता फ़्क़्त तिच्याकडे पाहायला लागलो होतो , गर्दीचा काहीएक विचार न करता , प्रत्येक स्टेशन वर उतरताना आणि चढताना गर्दी चे धक्के लागत होते काही जन तर अक्षरशः पाय तुडवत होते माझे पण मला त्याच काहीच भान आणि तमा नव्हती मी माझ्या अणि तिच्या स्वप्नात गुंग झालो होतो . 

आमच  स्टेशन यायची वेळ झाली म्हणून लोकल मधून खाली उतरल्यावर तिच्याशी काय बोलायचं अस मनाशी ठरवायला लागलो , गर्दीला लोटून स्टेशन वर उतरलो , ती हि माझीच  वाट पाहत उभी होती , मी उतरून तिच्या पाशी गेलो तर ती मला पाहून गालातल्या गालात हसायला लागली . मला काही कलेच ना ती माझ्या कडे बघून का हसतेय ते , म्हणून मी स्वतावरच थोडीशी नजर फिरवली तेव्हा कळाल ती माझ्या झालेल्या अवतारावर हासत होती ,लोकल च्या  गर्दीने माझ्या अवताराची वाट लावली होती , शर्टचा आर्धा इन निघाला होता , माझ्या काळ्या बुटांवर उमटलेले आणखी काही लोकांचे ठसे , कुणाच्या तरी टिफिन बॉक्स मधून निघालेला तेलाचा ओघोल माझ्या शर्टाच्या डाव्या बाजूला लागला होता , चेहऱ्याची काय अवस्था होती काय माहित नाही म्हणून झटकन खिशातून रुमाल काढला आणि चेहरा पुसला , तेव्हा मात्र तीच ते गालातल हसून जोराने बाहेर आल आणि ती थोड जोरानेच हसायला लागली , मग काय तिच्या ह्या हसण्या समोर मी अवघडूनच गेलो , आणि तिला विचारल "काय झाल ? एवढ हसायला ", तिने हि तीच हसन थोड कंट्रोल करून माझ्या विस्कटलेल्या केसंविषयी सांगितल , मी लगेच मोबाईल मध्ये स्वताचा चेहरा पाहिला  खरच झोपेतून उठल्या सारखा अवतार झाला होता , सकाळी तिच्यासाठी उठून जो एवढा तयार झालो होतो त्याचा काही एक उपयोग झाला नाही , पण मला त्या गोष्टीच इतक काही वाटत नव्हत मी फ़्क़्त तिलाच पाहत होतो , त्यातच मी विस्कटलेले केस निट  विंचरले , शर्टचा इन निट  केला , तेवढ्यात ती म्हणाली "भेटूया संध्याकाळी , येणार आहेस ना इथे ?" मी हि लगेचच "हो , येणारच ना " अस अगदी धाडसाने उत्तर दिल आणि आम्ही दोघही आपापल्या  ऑफिस च्या दिशेने निघालो .

आजकाल तशी आमची रोज भेट होते , फोन होतात , मेसेजेस तर ठरलेलेच , एक अनोळखी असणारी ती कधी बोलेल कि नाही ह्याची खात्री हि नव्हती , ह्या रोजच्या प्रवासात तिच्याविषयीच्या अनेक आठवणी मी मनात साठवत चाललो होतो  तिने साडी नेसली होती त्या दिवशी तिला पाहून ह्रुदयातुन घायाळ झालेला मी , आणि त्या एका शनिवारी ट्रेन  मध्ये चढताना झालेला तिचा तो  स्पर्श तेव्हा  अंगातून वीज धावून जावी  अस वाटण , असे खुप काही क्षण जोडले जात होते , तिच्याशी बोलण्यात जी मजा आणि तो आनंद होता ना तो  वेगळाच होता .पण माझ्या मनात तिच्या विषयी जे प्रेम होत ते तिच्या मनात माझ्याविषयी होत कि नाही ह्याचा काही अंदाज येत नव्हता तरीही जे चालल होत ते   सगळं अगदी स्वप्नातल्या सारख अगदी छान चालल होत.

पण .... हो... हा "पण" इथेही आलाच , सगळ काही निट  चालल होत माझ्या बाजूने पण जे काही घडल किंवा घडायला लागल  होत ते सारच अनपेक्षित , हे सार अनपेक्षित  होत की मी ह्याबद्दल विचारच केला नव्हत म्हणून अनपेक्षित वाटत होत , माहीत नाही . सांगेन ह्या अनपेक्षित गोष्टीबद्दल पुढच्या भागात .

- प्रफुल्ल शेंडगे



२० मिनिट-भाग 1                    २० मिनिट भाग-2

20 मिनिट-भाग 2


इतर भाग वाचण्यासाठी    20 मिनिट- भाग 1             २० मिनिट भाग-३          २० मिनिट -भाग 4


       माझ्या नेहमीच्या स्टेशन वर न उतरता तिच्या स्टेशन वर उतरण आणि निघताना पुन्हा तिथूनच लोकल पकडन हा माझा नविन उपक्रम चालू होता मागच्या ३-४ दिवसांपासून तो हि फ़क़्त तिला पाहण्यासाठी. पहिल्याच दिवशी ते काय थोड बोलली होती तितकच . परत बोलन झाल नाही दुरूनच तिला पाहत राहायचो , मुद्दाम लेडीज डब्ब्याच्या बाजूच्या डब्ब्यात बसायचो तिला चोरून पाहता याव यासाठी  .

          शनिवार चा दिवस होता . माझ ऑफिस लवकर सुटल होत , आणि झालेल्या सवयी प्रमाणे मी पुढच्या तिच्या स्टेशन वर गेलो , माहित नव्हत तीच हि ऑफिस लवकर सुटणार होत कि नेहमीच्या वेळेला. पण गेलो तिच्या स्टेशन वर बघूया नशिबात काय आहे अस स्वताशिच म्हणून , स्टेशन वर उतरलो आणि नेहमीच्या जागी जावून उभा राहिलो पण ती काही दिसली नाही , मनात पुन्हा विचारांचं चक्र सुरु झाल , मी मुद्दाम येणारी एक-एक लोकल सोडत होतो , ती येयील ह्या आशेने , १० मिनिट , १५ मिनिट , अर्धा तास तसाच तिथ उभा होतो तीची वाट पाहत , इकडे तिकडे पाहत , तोच पायर्यांवरून प्लेटफार्म  कडे येताना ती दिसली , मन आनंदाने उड्या मारायला लागल होत माझ , ती नेहमीचा लेडीज डब्बा पकडण्यासाठी येत होती तोच लोकल आली , त्या दिवशी तशी फारशी गर्दी हि नव्हती पण लोकल सुटणार म्हणून घाई घाईत ति लेडीज डब्ब्यात न जाता जनरल डब्ब्यात शिरली .. मी हि त्याच डब्ब्यात होतो , पण मला माहिती नव्हत कि ती माझ्याच  डब्ब्यात होती ते , मी एका सीट वर जावून बसलो होतो त्या पलीकडच्या डब्ब्यात नजर लावून तीला पाहण्यासठी तोच समोरच्या सीट वर ती येवून बसली . थोडा वेळ मला काही कळलच नाही , स्वप्न तर नाही ना बघत म्हणून स्वतालाच हलकासा चिमटा काढून पाहिला ,स्वप्न नव्हत, खरच ती माझ्या समोर बसली होती ह्याची खात्री पटली , दररोज तिच्या कडे टक लावून पाहणारा मी, ती आज एवढ्या समोर बसली असतानाही तिच्याकडे पाहण्यची हिम्मत माझ्यात होईना , मी उगाच इकडे तिकडे पाहत राहयचो , पण एक वेळी ती माझ्याकडे एका प्रश्नार्थक नजरेने पाहत असल्याच जाणवल , मी न पाहिल्यासारख केल , तोच तिने मला विचारलं "तुम्हाला कुठ तरी पाहिल्या सारख वाटतंय ?”  तिच्या ह्या प्रश्नाने माझ्या हृदयाची धड-धड लोकल च्या स्पीड पेक्षा जास्त जोरात वाढवली होती . मी विचार करत असल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणले तोच ती म्हणाली "हो !, त्या दिवशी मी तुम्हाला पत्ता विचारला होता ना ? ते तुमीच ना ?” मी आश्चर्यचकितच राहिलो आणि मलाही आठवल्यागत हो-हो केल , मनात विचार केला अशी बोलायची संधी पुन्हा पुन्हा नाही भेटायची आणि मी हि सुरु झालो बोलायला "काय मेमरी आहे तुमची ? मस्तच , एकदाच पाहिलेलं लक्षात राहील ?” ती काही बोलली नाही पण हसली गालात , अगदी गोड . एका मागून एक स्टेशन जात होत आणि आमच्या गप्पा ही रंगात आल्या  होत्या , ऑफिस कुठ , काय जॉब अशा वर वरच्या गोष्टी , तिने हि मला माझ्या ऑफिस बद्दल विचारल , मी म्हटल मी अमुक कंपनीत आहे , ह्या ठिकाणी , त्यावर ती म्हणाली "मग तुम्हाला ते अलीकडच स्टेशन जवळ आहे ना, तुम्ही इथून का लोकल पकडता ?” हा माझ्यावराचा तिने टाकलेला आणखी एक बोम्ब , मी पण एक कारण पुढ केल "त्या स्टेशन वर फार गर्दी असते बुवा , ह्या स्टेशन वर किमान उभ राहायला तरी जागा मिळते ” बहुतेक तिला माझ उत्तर पटल  असाव , तस तिच्या चेहऱ्यावरून वाटत होत , गप्पा सुरूच होत्या आमची अगदी एकमेकांचे नंबर शेअर करे पर्यंत आमची ओळख झाली होती आज . तितक्यात तीच स्टेशन येणार होत , २० मिनिट कशी दोन मिनिटात गेली अस वाटायला लागल , ती निघायला लागली  , “उद्या तर सुट्टी आहे , परवा भेटू अस म्हणत तिने निरोप घेतला ”आणि  ती तिच्या स्टेशन वर उतरली आणि मी त्याच क्षणापासून आमच्या सोमवारी होणार्या भेटीबद्दल स्वप्न रंगवायला हि लागलो.

       पहिल्यांदाच मी सोमवारची एवढ्या उतावळेपणाने वाट पाहत होतो , रविवार नकोसा झाला होता मला , कसाबसा सोमवार उजाडलं , आणि तिच्या अनामिक ओढीने मी संचारलो . काय घडणार होत कशाचीच कल्पना नव्हती , पण मनातून मात्र मला जाम भारी वाटत होत.

ह्या सोमवारी घडलेल्या अणि त्यानंतर च्या  घडामोडी तुम्हाला सांगेण पण पुढच्या भागात . 

-प्रफुल्ल शेंडगे.  

इतर भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा   20 मिनिट- भाग 1        २० मिनिट भाग-३      २० मिनिट -भाग 4