एक संध्याकाळ

                              संध्याकाळी ५:३० ची वेळ होती , नेहमी प्रमाणे मी ऑफिस मधून रूम वर जायला निघालो , पावसाचे दिवस होते , पण पाऊस नसला तरी हवेत मंद गारवा पसरला होता , ऑफिस मधून निघाल्या पासूनच मनात थोडस उदास उदास वाटत होत , ऑफिस मध्ये हि काहि विशेष घडलं नव्हत , रूमवर जावून तोंडावर सपासप पाण्याचा मारा केला , वाटल होत थकव्याने उदास वाटत असेल म्हणून पण त्या पाण्याचा फ़्क़्त चेहऱ्यावर तेवढा फरक पडला पण मनातली अस्वस्थता तशीच कायम होती ... थोडा बदल म्हणून बाहेर फिरायला निघालो , सूर्य मावळायला आला होता , आकाशात पिवळ्या रंगाची चादर पसरली होती , मधूनच एखादी वारयाची एक गारेगार झुळूक अंगाला स्पर्श करून जायची त्यामुळे अंगावर हलकासा शहरा येत होता , मी तसाच पुढे पुढे चालत होतो , त्यावेळी फ़्क़्त माझे पाय चालत होते मनातले विचार अगदी सिग्नल ला थांबलेल्या गाड्यांसारखे थांबून गेले होते , पण किती वेळासाठी ते काही माहित नव्हत

                                          चालत चालत एका चहा च्या कॅन्टीन पाशी येवून बसलो आणि चहा वाल्याला एक चहा मागितला , त्याने माझ्या कडे पाहिलं आणि म्हणाला "भजी देवू का दादा ? गरम गरम आहेत ” , मी होकारार्थी मान डोलावली , काय चालल होत माझ मलाच कळत नव्हत , समाधी लागल्यासारखा मी शून्यात पाहत बसलो होतो , चहाचा वाफाळणारा वास दरवळायला लागला होता आणि त्याच सोबत उकळत्या तेलात भजी तळायला सोडल्यावर येणारा तो आवाज जणू माझी ती समाधी तोडू पाहत होता , थोड्याच वेळात चहा आणि भजी टेबलावर ठेवून चहावाला निघून गेला , मी गुरफटलेल्या विचारातच चहाचा कप उचलला आणि तोंडाला लावला तसा गरम चहाने ओठांना जो चटका बसला त्याने थोडासा मी माझ्या समाधीतून बाहेर पडलो , आणि भजी सोबत चहाचा आस्वाद घ्यायला लागलो , त्याच दरम्याण त्या पिवळ्या नभांच्या चादरीवर काळे ढग पसरले होते , वारा थोडा जोरात वाहू लागला होता , पाऊस सुरु होणार ह्या शक्यतेने मी तो चहाचा शेवटचा घोट घेतला , चहावाल्याला पैसे दिले आणि मी निघणार तेवढ्यात पावसाच्या सरी धावत आल्या, जणू काही त्या मी निघण्याचीच वाट पाहत होत्या , आणि येताना मी सोबत छत्री हि आणली नसल्यामुळे तिथेच थांबन्या शिवाय दुसरा पर्याय हि नव्हता , मग परत जावून त्या टेबलाजवळ बसलो आणि रस्त्यावर नजर फिरवत पाहायला लागलो , अचानक आलेल्या पावसामुळे लोंकाची जी त्रेधातीरपीट उडालेली दिसत होती ती न्याहाळायला लागलो , जो तो मिळेल त्या आडोशाला उभा राहत होता , आत्ता पर्यंत माणसांनी गजबजलेला रस्ता जणू पावसाने गिळून नेला कि काय असा वाटायला लागल होत त्या निर्मनुष्य झालेल्या रस्त्याकडे पाहून .
                                           अशीच नजर फिरवताना माझ लक्ष गेल ते एका आडोश्याला उभ्या असलेल्या एका मुलीकडे , जेमतेम 6-7 वर्षांची असेल अंगावर पिवळा धमक फ्रोक , केस विस्कटलेले एका कडेवर एक मुलगा होता अगदी 1-2 वर्षांचा , अंगावर फ़्क़्त एक चड्डी आणि बाकी पूर्ण अंग उघड असलेला , धुळीने पूर्ण अंग मळकटल होत , आणि ती मुलगी कौलावरून पडणार्या पावसाच्या पाण्यने त्याच तोंड धुवत होती पण त्याची पावसात भिजण्याची धडपड अगदी दिसत होती आणि मग काय शेवटी त्याच्या हट्टा समोर तिला हि हार मानावीच लागली , दोघानिही चिंब भिजायला सुरुवात केली , आणि ह्या भावंडा कडे पाहून मनातले झोपलेले विचार खडबडून जागे झाले आणि सार्यांनी डोक्यात एकच गर्दी केली , थोडस सावरून स्वतच्या विचारात पुन्हा गुंतून गेलो , आणि पहिल्याच विचार बरोबर एक दृश्य डोळ्यासमोर उभ राहील ते म्हणजे .... लहानपणी पाऊस आल्यावर त्या पावसात भिजण्याची जी आपली सवय होती ती आठवली , पावसात ओल चिंब भिजायचं , साठलेल्या डबक्यात पाणी उडेपर्यंत जोराने मारलेल्या ड्या , कागदी होड्या बनवून मित्रांच्या होडीसोबत लावलेली पैज , किती बेफिकीर पणे आणि आनंदाने आपण आपल बालपण घालवल होत ह्याचा प्रत्येय यायला सुरुवात झाली होती त्यावेळी आपल्याला कशाचच टेन्सन नव्हत फ़्क़्त एन्जोय करायचो आपण आपला प्रत्येक क्षण , आई बाबांकडे खेळणी- चोकलेट साठी हट्ट करायचो ,वाढदिवसाला नवीन कपड्यांसाठी रुसून बसायचो , तरी पण आज आपण प्रत्येक सुखाच्या मागे धावत असतो , कितीही भेटल तरी आणखीची हाव आपल्या पासून काही सुटत नाही , आणि हि मुल अंगावर पुरेसे कपडे नाहीत, खायला अन्न भेटेल कि नाही ह्याची शास्वती नसताना हि आयुष्य कस जगत असतील हा प्रश्न मनाला चटका लावून जात होता ,ढगांच्या एका कडकडाटाने मी विचारांच्या ह्या तंद्रीतून बाहेर आलो .
                                           पावसाचा जोर काही अंशी कमी झाला होता आणि लोक आडोशा पासून लांब होवून स्वतच्या वाटेला निघाली होती.. ती भावंड हि तिथून निघून कॅन्टीन जवळ येतान मला दिसली , कॅन्टीन च्या शेड खाली आल्यावर त्या मुलीने आपल्या भिजलेल्याच फ्रोक ने आपल्या छोट्या भावच भिजलेले डोक आणि तोंड पुसायला सुरुवात केली त्यावेळी त्या भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या चेहर्या वरची माया पाहून भावा-बहिणीच नात किती गोंडस आहे ह्याचा पुन्हा एकदा अनुभव आला , अंग पुसून झाल्यावर तिने त्याला पुन्हा एकदा कडेवर घेतल आणि तिथून निघू लागली आणि मी पण त्यांच्या चेहर्या वरचा आनंद पाहून मनोमन खुश होवून गेलो होतो ,दर वेळेस च्या पावसासारख ह्या पावसाने हि मला काहीतरी दिल होत , माझ्या मनावरची मळभ दूर केली होती आणि मी काहीतरी नवीन मौल्यवान सापडल्याच्या अविर्भावात पुन्हा रूम कडे निघू लागलो ... 

                                                        -प्रफुल्ल शेंडगे 

भारत माझा देश आहे .

                   शाळेतल्या दिवसात प्रार्थनेच्या वेळी आपण एक प्रतिज्ञा बोलायचो, आठवते का ती प्रतिज्ञा ?, हो ! अगदी बरोबर "भारत माझा देश आहे.... ” , ह्याच प्रतिज्ञे वर आधारित मराठी मध्ये एक धडा होता "भारत माझा देश आहे ” नावाचा , कितव्या इयत्तेत होता ते मात्र मला काही नीटस आठवत नाही , पण त्यात लेखकाने एक छान विचार मांडला होता , का “भारत माझा देश आहे ” अस लिहल आहे प्रतिज्ञेत का नाही लिहल गेल कि "भारत आपला देश आहे ”, कारण आपण स्वतच्या गोष्टीना "माझा /माझी ” अस संबोधतो आणि सर्वांच्या गोष्टीना "आपला / आपली ” अस म्हणतो , आणि स्वतच्या गोष्टीना जेवढ आपुलकीने , प्रेमाने , काळजीने जपतो , सांभाळतो तेवढ आपण "आपल्या ” गोष्टीना सांभाळत नाही, कारण ती सर्वांची असते ना , आपण हा विचार करतो कि , 'मीच का लक्ष देवू , देयील न कुणीतरी लक्ष, घेयील कुणीतरी काळजी ' मात्र प्रत्येक जन हाच विचार करत बसतो आणि सगळ्याचंच दुर्लक्ष होत .....

                  पण शाळा संपली तसं आपण हि "प्रतिज्ञा ” विसरलो आणि भारत माझा देश आहे हे हि विसरून गेलो , आता आपल्या इथला प्रत्येक जन दुसरा देश आपल्या भारता पेक्षा कसा चांगला ह्याबद्दलच बोलत असतो , 'त्या ' देशातली स्वच्छता पहिली ? , "काय शिस्त आहे यार तकडे ", "आपल्या भारतात काहीच होवू शकणार नाही ", दुसर्या देशात गेल्यावर तिथले नियम , कायदे अगदी बरोबर पाळता न तुम्ही ?, आपल्या देशातही तेच आणि तसेच कायदे -नियम आहेत पण आपल्याला ते गळ्यातला दोरखंड वाटायला लागतात आणि येता- जाता तो कापायचा आपला प्रयत्न चालू असतो , दुसर काही नाही?
                 माझ म्हणन अस नाही कि ,तुम्ही दुसर्या देशाबद्दल चांगल बोलू नका अस , बोला ना दुसर्या देशाबद्दल चांगल , खरच असेल तो देश आपल्या पेक्षा पुढे , पण विचार करा "का आहे तो देश आपल्या पुढे ?” कारण तिथली मानस , तिथले नागरिक स्वतःच्या (फ़्क़्त स्वतःच्या ) प्रगतीकडे न पाहता देशाची प्रगती कशी होईल ह्याचा विचार करतात , आणि आपण फ़्क़्त नाव ठेवण्यात आपला वेळ घालवतो , तसं कधी आपण आपल्या देशाविषयी कधीच चांगल बोलत नाही अस नाही , बोलतो कि आपण हि आपल्या देशाबद्दल चांगल , पण कधी माहिती आहे का ? वर्षातले फ़्क़्त 2 दिवस ! आपण आपल्या देशाच गुणगान गातो ते म्हणजे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी , आणि वाटतो अभिमान देशाचा जेव्हा "भारत ” जिंकतो एखादी क्रिकेट मैच तेव्हा ....कुणी एकाने मस्त वाक्य बोलून ठेवल आहे
                      आजकाल देशभक्ती सिर्फ तारीखो पे आती है , और चली जाती है ”

आपण का विसरतो , कि आपण म्हणजेच "देश ” आहोत , देशातली हि करोडो जनता म्हणजे भारत आहे , का वाट पाहतोय आपण आज हि कुणी तरी सुरुवात करायची ?, उचला ना तुम्ही पाहिलं पाऊल , करा ना प्रतिनिधित्व , किती दिवस गर्दीतला एक सामान्य चेहरा बनून राहनार ? , करा दुसर्या देशातल्या चांगल्या गोष्टींच अनुकरण , ते जी स्वच्छता , शिस्त, देशप्रेम बाळगतात , बाळगा न ते हि तुमच्या अंगी , आणि घडवा आपला हि देश त्यांच्या देशासारखा , ज्याचा तुम्हाला ,स्वताला दरदिवशी अभिमान वाटेल , आणि बाकी सारया जगाला हि आपल्या देशाच कौतुक वाटाव असा ..... आणि त्यासाठी सतत जागृत ठेवा एक विचार कि "भारत माझा देश आहे  ”.

                                                                                                  -- प्रफुल्ल शेंडगे .

नावात काय आहे ?

                    नावात काय आहे ? अस शेक्सपियर कधी काळी बोलून गेला . पण तेच वाक्य आजही आपण कधीतरी उच्चार्तोच , पण थोड गांभीर्याने विचार करायला लागलो तर आपल्यालाही समजेल कि , नावात काय काय दडलेलं आहे . आता हेच पहा न "नावात काय आहे ?” हे वाक्य बोलणारा हि आपल्याला त्याच्या नावामुळेच कळला नाहीतर कुणाला कधी कळाल असत कोणी हे बोलून ठेवलं आहे ? . प्रत्येकाची प्रथम ओळख हि त्याच्या नावाने होते , जन्म दाखल्या पासून ते शाळेच्या दाखल्या पर्यंत आणि सोशल साईटस च्या प्रोफाईल नावापासून ते मृत्यू च्या दाखल्या पर्यंत सगळीकडे नाव म्हत्वाच आहेच , आपल नाव सगळ्यानाच प्रिय असत , कुणी तुमच नाव चुकीच उच्चारलं किंवा लिहल तर चढतो ना पार तुमचा काही अंशी वरती , कुणी घेतलं नाव ओठी अगदी प्रेमाने तर वाटत न मन प्रसन्न हीच तर गम्मत आहे ना नावाची .
                           पण समजा जर नाव हि गोष्टच अस्तित्वात नसती तर किती गोंधळ उडाला असता , कुणाला- कस ओळखायच, संबोधायच फारच कठीण होवून झालं असत , महत्वाच म्हणजे "नाव कमावण्याच्या ” ह्या शर्यतीत कुणी उतरलच नसत , आणि लग्नानंतरच्या "उखाण्यात नाव " घेण्याची गोंडस प्रथा हि अनुभवायला मिळाली नसती ,मला वाटतय जर "नाव" हि संकल्पना नसती तर ह्याचा जास्त फटका बॉलीवुड वाल्यानाबसला असता ,नाहीतर अमिताभ बच्चन - त्याच्या हिरोईन ला "माय नेम इस अंथोनी ” अशी ओळख करून देवू शकला असता का? , शाहरुख च्या त्या "राहुल ,नाम तो सुना हि होगा ” ह्या डायलॉग वर शिट्ट्या वाजल्याच नसत्या,आणि "नाम बडे ओर दर्शन छोटे "ह्या गाण्यावर भगवान दादा थिरकलेले पाहता आले असते का ? 
                          पण एक मात्र बर झालं 'शेक्सपियर च वाक्य जास्त मनावर न घेता नावावर बंदी नाही आणली ते, शेवटी नावात काय आहे ? हे सांगता येणार नसल तरी "नावात खूप काही आहे ” हे मात्र नक्की !
                                                                                                               -- प्रफुल्ल शेंडगे .

आपण ह्यांना पाहिलात का ?






         बरेच दिवस झाले एक गोष्ट शोधण्याचा मी खूप प्रयत्न करतोय , पण काही केल्या ती काही भेटतच नाहीये , अगदी कुणीही भेटल तरी प्रत्येकांना मी त्या गोष्टी बद्दल विचारतोय , पण कुणालाही ती माहिती नाहीये , काहींनी तर मला अगदी प्रात्यक्षिक देवूनच अनुभव दिला कि त्यांनी आयुष्यात कधी ती गोष्ट पहिलीच नसेल याचा , तर काही जन भेटले त्याचं म्हणन होत कि काही वर्षांपूर्वी पाहिलं होत पण सध्या मात्र कुठ दिसलीच नाही तुम्हाला भेटली तर आम्हाला हि सांगा , म्हणून काय कराव ह्याचा विचार केला आणि बाबांची आठवण झाली , बाबा म्हणजे ते भविष्य सांगणारे नाहीत तर आपले गुगल बाबा , त्यांच्या कडे सगळ्या प्रश्नाची उत्तर भेटतात म्हणे म्हणून त्यांना विचारून पाहिलं तर ते हि म्हणाले “सर्च नॉट फाउंड ,मग दूरदर्शन च्या “आपण ह्यांना पाहिलात का ?” मध्ये जाहिरात द्यावीशी वाटली पण इथेही एक अडचण माझ्याकडे तिचा ना काही फोटो होता ना काही वर्णन ,मग शोधू कसा ?पण इतक मात्र ठामपणे माहिती आहे कि , हिरे-मोती , सोन्या चांदी एवढी मौल्यवान नसली तरी , ती जवळ असली तरी माणूस श्रीमंत होतो अस ऐकिवात होत , नाही कळाल ? मी काय शोधतोय ते ?
अहो माणसाची खरी ओळख असलेली आणि आता अस्त पावत चाललेली "माणुसकी ” शोधतोय मी .
                           हो ना ? आत्ता तुम्हालाही वाटलं असेलच ना खरच हि माणुसकी हरवत चाललेली आहे ..आपल्या सभोवताली एक नजर फिरवली तरी ह्या माणुसकीचा अभाव जाणवायला सुरुवात होते , आपण सर्व जन आपापल्या कामात एवढे गुंतत चाललो आहोत कि दुसर्यांचा विचार करायची वृत्तीच हरवून बसलो आहोत , सामाजिक प्राण्याची ओळख हरवून बसलो आहे , जिथ आपण माणुसकीच नातच मानत नाहीये तिथ बाकी नात्यांना किंमत कशी देणार ?
भुकेल्याला अन्न द्यावे
तहानलेल्या पाणी द्यावे .....हि साधी शिकवन हि विसरून गेलो ...फ़्क़्त "मी"पणा च्या गर्तेत उरलेला विचार घेवून चालणारा एक जीव... एवढीच ओळ्ख बनत चालली आहे आपली
म्हणूनच गरज आहे माणुसकीला पुन्हा शोधण्याची, पुन्हा एकदा वाढवण्याची आणि दुसर्याच्या मनात हि तिला रुजवण्याची मग माझ्यासोबत घ्या तुम्ही हि तिचा शोध , पण सुरुवात स्वतः पासून करा कुणास ठावूक तुमच्या स्वतच्या आतमधल्या माणुसकीने कुणाची तरी हि शोध मोहीम पूर्ण होईल ....आणि जर तुम्हाला भेटली हि माणुसकी कुठे तर ह्या बाबतीत व्हा थोडस स्वार्थी, ठेवा तिचा काही भाग स्वतः जवळ आणि पाठवत राहा पुढे जो पर्यंत सर्वांना ह्या माणुसकीचा चेहरा दिसत नाही तोपर्यंत ...

                                                                                                                         -प्रफुल्ल शेंडगे
 

सुजाण (?) चौथा खांब

                    पत्रकारिता , लोकशाही चा चौथा आणि महत्वाचा खांब , सामान्य नागरिकाला देशात आणि जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती देण्यात , लोकांना सुजाण बनवण्यात पत्रकारितेचा मोठा हात आहे ,स्वातंत्र्य पूर्व काळात हि लोकांना जागृत करण्याच काम केसरी सारख्या वृत्तपत्रांनी केल होत , काळ बदलला तसं अनेक बदल घडत गेले , प्रिंट मेडिया च्या बरोबरीने इलेक्ट्रोनिक मेडिया हि आता आपल्या देशात आला होता , देशात- जगात काय घडलं असेल ह्याचा विचार करत करत सकाळी येणाऱ्या वृत्तापत्राची वाट पाहणारे आपण , इलेक्ट्रोनिक माध्यमांमुळे वृत्तपत्र विसरून गेलो आहोत , प्रत्येक बातमी आता आपल्याला याची देही याची डोळा पाहता यायला लागली तीही अगदी तत्क्षणी.
                         पण थोडा विचार करून सांगा , आज आपण खरच न्यूज पाहतो का ? पाहत असलो तरी देशात काय घडतंय ते जाणून घेन्या साठी तरी नक्कीच पाहत नाही ? पाहतो ते फ़्क़्त टीवी मालिकेत , सिनेमात काय चालू आहे ह्या साठीच . खर ना ? माहिती आहे तुमच उत्तर हि "हो"च असेल , कारण मीही काही त्याला अपवाद नाही , आणि ह्या सार्या गोष्टींचा विचार करायला लागलो कि ,का आपण फ़्क़्त ह्याच गोष्टींसाठी मेडिया कडे पाहतो आहे? , आणि एक कारण सापडत ते म्हणजे पत्रकरिते मध्ये सुरु झालेली स्पर्धा , आज आपल्यकडे एका दिवसात जेवढ्या घटना घडत नसतील तेवढी न्यूज चैनेल सुरु झाली आहेत , बाकी सगळ्या चैनेल पेक्षा आमच चैनेल कस पुढ ह्याचा दिखावा चालू असतो , प्रत्येकजण हेच म्हणतोय "आम्ही दाखवली हि बातमी सर्वात आधी ”, अरे पण आम्हाला बातमी कोण आधी दाखवतो त्या पेक्षा कोण त्या बातमी मागच गांभीर्य , सत्य पडताळून ती बातमी दाखवतो ते महतवाच आहे . कुठला बॉम्बस्फोट असो किंवा अपघात असो ह्यांची जखमी आणि मृत लोकांच्या संख्येची चालेली चढा ओढ , एक म्हणतो १० तर दुसरा म्हणतो १२ मग तिसरा लगेच २०-३० आकडा घेवून तयारच असतो ,एक्सक्लूसिव, स्टिंग ऑपरेशन च्या नावाखाली डॉन , गुंड लोकांशी पत्रकार घेत असलेली मुलाकात , निवडणुकांच्या आधी दाखवले जाणारे एग्जिट पोल पहिले कि वाटत हे खरच सर्वेक्षण आहे कि राजकीय पार्ट्यांची केलेली जाहिरात , जे त्यांना हव आहे तसं लोकांच्या मनावर बिम्बावण्याचा निव्वळ प्रयत्न , त्यावेळी वाटत खरच सगळी कडे बाजारीपणा चालला आहे .

                                २६/११ चा दहशतवादी हल्ला आठवतो का तुम्हाला ? हो आठवत असेलच ना तुम्हालाही , पाहिलं असेल ना तुम्ही हि न्यूज चैनेल वर तेही लाइव, NSG कमांडो , पोलिसांनी केलेले शर्थीचे प्रयत्न , अहो पण जे आपण टी.व्ही. वर पाहत होतो ते हल्ला करणरे हि पाहत असतीलच ना ?, आपले पोलीस, कमांडो कशापद्धतीने व्यूहरचना करत आहेत तेही पूर्ण विश्लेषणं सहित , आणि ते विश्लेषण करणारे आपलीच मानस , कुठल्या परिस्थितीत काय सांगाव - काय दाखवू नये ह्याच भान हि असू नये ? सुजान म्हणवता ना स्वतःला ? , कधी सकाळी ४-6 च्या दरम्यान न्यूज चैनेल पाहिलेत का कधी ? कुठल्या तरी (भोंदू)बाबांचं प्रवर्चन चालू असत , आणि मग दिवसभर तेच चैनेल आम्ही कसे अंधश्रद्धेच्या विरुद्ध आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असत . हि विसंगती नाही का ?

                            आता तर काय एक नवीन कार्यक्रम आखला आहे , चार पाच विश्लेषक, तज्ञ लोकांना बोलावून आणि चार-पाच चौकटी बनवून चर्चा सुरु करायची , चर्चा कसली ओ ती , नुसता गोंगाट , कोण कुणाच ऐकून घेत असत तिथ ? सगळे आपलच म्हणन मांडत असतात , आणि एखादा सांगत असतो महत्वाच तर त्याच क्षणी ब्रेंक ची वेळ होते ह्यांची , मग वाटायला लागत मनात कुठेतरी कि , ह्या चर्चा फक्त नावालाच आहेत ह्या चर्चांचा शेवट काय करायचा हे त्यांनी आधीच ठरवून ठेवलेलं असत फ़्क़्त दाखवण्य पुरती ती चर्चा , आणि चर्चा हि कसल्या कसल्या विषयावर तर "म्हणे ह्या दहशतवाद्याला / गुंडाला मिळालेली शिक्षा योग्य कि अयोग्य ” हे प्रश्न हि तेव्हा विचारतात जेव्हा न्यायालयने त्या गुंडाला त्याची हि बाजू समजून शिक्षा दिलेली असते तेव्हा..आणि कुणी काही बोलूही शकत नाही कारण शेवटी प्रश्न पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा आहे ना ?

                वाईट मात्र एकाच गोष्टीच वाटत ते म्हणजे सुक्या सोबत जळणाऱ्या ओल्याच कारण आजही ह्या "वातावरणात " काही माध्यम आहेत "खरया" सत्याचा शोध घेणारी , निपक्ष बाजू मांडणारी आणि स्वतची सामाजिक जबाबदारी ओळखून पत्रकारिता जोपासणारी ...एक सलाम अश्या पत्रकारितेला आणि ती जोपासणार्य पत्रकारांना ... कारण त्यांच्या मुळेच आपल्या लोकशाहीचा चौथा खांब आजही टिकून आहे आणि आपली लोकशाही ताठ मानेने उभी आहे .... 

                                                                                                                         -प्रफुल्ल शेंडगे .

नाविन्याचा शोध

"काय रोज रोज तीच भाजी ? काहीतरी वेगळ करत जा ना ? ", "वैताग आलाय रोजच्याच त्या रडक्या मालिका बघून ","रोज मरे त्याला कोण रडे ? नेहमीचाच आहे हे "....थोडे ओळखीचे वाटतयेत का हे शब्द ? , हो ना ? आपलेच शब्द आहेत हो हे , रोज रोज एकाच गोष्टीला कांटाळलेलो आपण , काहीतरी नवीन मागत असतो , हो ! मागत असतो कारण, आपण स्वतः मात्र बदल करायला सरसावत नाही , "चलता है यार " म्हणून आपण आपल जगण ढकलत राहतो आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर विचार करायला वेळ मिळतो , तेव्हा आपण विचार करत राहतो  कि "आयुष्यात काही तरी करायला हव होत , थोडस हटके ”, पण तोपर्यंत वेळ झालेला असतो , आणि इच्छा असून हि आपण काही हि करू शकत नाही

दररोज तेच ऑफिस आणि तेच काम करून डोक्याला मुंग्या यायला लागतात तरी पण पर्याय नाही म्हणून आपण गप्प मुकाट्याने daily routine मध्ये स्वताला अडकवून ठेवतो , पण कोणी स्वतः लाच किंवा आपल्या मनाला बोललात का कधी कि "काय यार रोज रोज तेच करतोस काही तरी बदल कर ” , नाही ना ? आता असा अर्थ काढू नका कि मी तुम्हाला रोज नवीन नवीन जॉब्स शोधायला आणि करायला सांगतोय , माझ म्हणन एवढच आहे कि जे काम तुम्ही रोज करता आहात त्यात हि काही नाविन्य शोधण्याचा प्रयत्न करा, का त्या ओझ उचलणाऱ्या गाढवा सारख वागताय , फक्त जगण्यासाठी जगायचं आहे असा का विचार करताय ? , ठीक आहे , जर नाहीच शोधता येत आहे तुम्हाला रोज्च्याच कामात नाविण्यापणा , मग जोपासा ना एक छोटासा छंद , घ्या न त्याचा आनंद , जा कधीतरी एकट्याने फिरायला ह्या technical जगा पासून लांब थोड निसर्गाच्या सानिध्यात , बघा सभोवताली निसर्गानी काय काय वाढून ठेवलं आहे तुमच्यासाठी, लहान मुलासारख काढत राहा ना चित्र मुक्त मानाने , उमटू द्या ना मनातले सुंदर विचार तुमच्या एका कोर्या कागदावर , बघा मन कस प्रफुल्लीत होवून जाईल , बागडू द्या स्वतच्या विचारांना फुलपाखरा सारखं मुक्तपणे , अहो फुलपाखरू पण रोज एकाच फुलाकडे नाही जात तो हि शोधतो नवीन फुल , आणि आपण तर अगदी माणसा सारखी मानस , त्या छोट्याश्या जीवाला जे कळत ते आपल्याला का नाही कळत ? तर जागे व्हा मनातून आणि टाका एक पाऊल नाविन्याकडे आणि घ्या आनंद खर्या जीवनाचा .

ऑल द बेस्ट !!!

जगाचा बाप

मनाशीच आपल्या भांडून तो रोजच कुढत- कुढत जगात होता ,
पण आज मात्र "आप " ल्याच माणसांसमोर जगाचा बाप लटकून मरत होता

कधी नव्हे तो देह त्याचा मेडिया चे footage बनला होता ,
कारण जगण्याने नाही, तर मरणाने त्याच्या , "त्यांना" TRP मिळत होता

त्याच्या कथित हक्कांसाठी ' ते ' स्वतःचे इमले बांधत गेले ,
पण पायाखाली 'त्यांच्या ' कितीतरी चिरडून मेले होते

आता पुन्हा मातीत ह्या नवा पोशिंदा जन्माला येणार नव्हता  ,
कारण आपल्याच माणसांसमोर जगाचा बाप मरून गेला होता .
कारण आपल्याच माणसांसमोर जगाचा बाप मरून गेला होता .

---------  प्रफुल्ल शेंडगे

आजादी की मांग



आजादी मांग रही है ,आजादी मांग रही है
देश की मिटटी मेरी आज भी आजादी मांग रही है |

खून में लथपथ हिमालय की चोटी,
चींख चींख कर शांति मांग रही है |
भूक से तड़फती एक जान
एक रोटी मांग रही है |
देश की मिटटी मेरी आज भी आजादी मांग रही है |

मजदूरी की भुल्भुलाय्या में फसा,“छोटू ”
अपना बचपन मांग रहा है |
घर की लक्ष्मी, बेटी
खुदकी जान मांग रही है |
68 साल के आजाद देश की मिटटी मेरी ,आजादी मांग रही है |
By-----प्रफुल्ल शेंडगे

अनोळखी मन

अनोळखी मन माझे , कधी तुझ्यात गुंतले
नाव जेव्हा तुझे , माझ्या हाती रंगले

अक्षतांच्या ह्या चिंब पावसात , नाव्हून गेले मी
जन्मो जन्मी च्या गाठीत तुजसवे बांधून गेले मी

शहारून जाई हृदयाला , तुझ्या सहवासाचा स्पर्श
तुझ्यासोब्तीच्या प्रत्येक क्षणात , दाटून येई हर्ष

आवाज तुझ्या हळुवार प्रेमाचा , माझ्या अंतरंगी घुमला
तुझ्या माझ्या स्वप्नातला , आपला संसार थाटला

काय अनोखी जादू  तुझ्या नजरेत, अजूनही नाही मज उमगले   !
बघताक्षणी पुन्हा पुन्हा तुला, तुझ्यातच हरवून का  दंगले ?

अर्धांगिनी जरी मी  तुझी ....तू प्राण  माझा पूर्ण  झालास
आयुष्याच्या सांजवेळीचा तूच माझा आधार झालास

स्वप्नातला माझ्या तू , राजकुमार होवून गेलास
सांग ना रे , मी तुझी  आणि तू कधी माझा होवून गेलास ???....
मी तुझी  आणि तू फ़क़्त माझा होवून गेलास !!!!!....


By--प्रफुल्ल शेंडगे .

मुलाकात

वो मिली , हम मिले
मुलाकात तो रोज जैसे ही थी
पर क्यों न समज पाया मैं
वो मुलाकात कुछ और ही थी

नजरो में प्यार भी वही था
आँखों में भी कुछ   नमी थी
पर चहरे पर छलक्नी वाली ख़ुशी
जाने कहा  गयी थी ?

आंसू का सैलाब लेके
जोरे से वो मुझसे लिपट गयी
सहर उठा मन भी मेरा
जाने कौन सी बात दिल पे मेरे लगी थी ?

संभल कर खुदको उसने
हाथ हमारा थाम लिया
पर कुछ कदम साथ चलकर , उसने ये  क्यों कहा की  ...
इस जन्म का आपका -हमरा सफ़र पूरा हुवा |

सवाल मन में मेरे हजारो थे
बाते अनकही तो लाखो थी
पर क्यों न जान पाया मैं
वही  मुलाकात हमारी आखरी थी |

By :-प्रफुल्ल शेंडगे