"नजर"

कस करू तुझ वर्णन मी काही ओळीत
जागा हि अपूरी पडते साठवायला मनाच्या झोळीत

दर वेळी पाहता  तुला जातो, काळजाला छेद
"smile" पाहूनच तर मिळते ,जगण्याची नवी उमेद 

अबोल राहूनही बोलून जातात तुझे डोळे बोलके 
पापण्यांच्या हालचालीने हि चुकतात हृदयाचे ठोके 

केस तुझे म्हणजे अंधार थंड गर्द रात्रीचा 
खुलून राहतो रंग गुलाब पाकळी ओठांचा 

सारख वाटत मनात पाहत रहाव तुला 
पण,वाटते भीती, माझीच "नजर" लागणार नाही ना तुला